डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अजूनही प्रतीक्षा

राज्यात उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होत असली, तरी महायुती तसंच महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांचं जागावाटप अजून स्पष्ट झालेलं नाही. महायुतीत भाजपाचे ९९ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार वगळता इतर उमेदवार जाहीर झालेले नाहीत.

 

दरम्यान, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून, उर्वरित जागांवर घटकपक्षांसोबत आज चर्चा होईल, त्यानंतर आजच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असं पटोले यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाहेर पडणार या बातमीत काहीही तथ्य नसल्याचं, पटोले यांनी स्पष्ट केलं.