राज्यात आजपर्यंत ९ कोटी ६३ लाख मतदारांची नोंद

राज्यात आजपर्यंत नोंदणी झालेल्या ९ कोटी ६३ लाख मतदारांमध्ये ४ कोटी ९७ लाख पुरुष आणि ४ कोटी ६६ महिला आहेत. १ कोटी ८५ लाख हे २० ते २९ वयोगटातले मतदार आहेत. २० लाख ९३ हजार मतदारांनी यंदा पहिल्यांदाच मतदारयादीत नाव नोंदवलं आहे. कातकरी, कोलम, मारिया गोंड या विशेषतः आदिवासी जमातींमधल्या सर्व २ लाख ७७ हजार मतदारांची नोंद मतदार यादीत केल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी इच्छुक पात्र नागरिकांना येत्या १९ तारखेपर्यंत अर्ज भरता येईल. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.