अतिवृष्टीमुळं ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित

अतिवृष्टीमुळं राज्यातले ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक १३ हजारांहून अधिक नागरिक सोलापूरात स्थलांतरित झाले आहेत. तर जालन्यात साडे ८ हजार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ हजारांहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे ४ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. गेल्या २४ तासात पुरात वाहून गेल्यानं राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला. त्यात अहिल्यानगरमध्ये २ आणि नांदेडमधल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. 

 

राज्यात सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे १८ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे ६ पथक तैनात आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.