सायबर गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या MahaCrimeOS AI’ ची मुंबईत सुरुवात

सायबर गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं MahaCrimeOS AI’ ची आज मुंबईत सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारच्या मार्व्हल या कंपनीच्या सहकार्यानं हा AI प्लॅटफॉर्म तयार केला आहे. सध्या नागपुरातल्या २३ पोलिस ठाण्यात याचा वापर सुरू आहे. लवकरच राज्यातल्या सर्व अकराशे पोलिस ठाण्यात याचा वापर सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेला यावेळी उपस्थित होते. मायक्रोसॉफ्टने भारतातल्या त्यांच्या १७ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचं आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे २० लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातलं सर्वात मोठे Global Capability Center उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.