राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरवण्यासाठी पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत एक वेगळी वीजकंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेअंतर्गत एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरकृषीपंप लावण्याच्या, राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं स्वीकारलं, या कार्यक्रमात ते बोलत होते.
गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं. महाराष्ट्राचा हा विक्रम आम्हीच मोडू, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.