ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंडं बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या रथयात्रेला आज सकाळी पुरी शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यासाठी जगभरातील हजारो भक्त पुरीमध्ये जमले आहेत. ही रथयात्रा तिन्ही देवतांना श्री गुंदीचा मंदिराकडे नऊ दिवसांसाठी घेऊन जाते. यात्रेच्या वेळापत्रकानुसार, श्री जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या संबंधित रथांपर्यंत देवतांच्या भव्य मिरवणुकीचा पहाडी बिजे विधी आज सकाळी साडेनऊ वाजता झाला. गजपती राजा दिव्यसिंहदेव या तीन रथांवर आज दुपारी अडीच ते साडेतीनदरम्यान चेहरा पहानरा विधी आणि शासकीय स्वच्छता विधी पार पडतील. त्यानंतर आज संध्याकाळी चार वाजता सध्याच्या अनंत रोडवर रथ ओढण्यास सुरूवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओडिशात पुरी इथल्या पवित्र रथयात्रेच्या शुभ प्रसंगी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Site Admin | June 27, 2025 2:03 PM | Jagannath Puri | Lord Jagannath's Rath | Lord Jagannath's Rath Yatra | Puri
ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेला पुरी इथं सुरुवात
