कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो असं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. कायद्याचा मसुदा पारदर्शक आणि सोपा असावा कारण सर्वसामान्यावर त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहातो. ते आज ३६ व्या आंतरराष्ट्रीय कायदा मसुदा प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संसद सदस्य आणि अधिकाऱ्यांना मसुद्याची सविस्तर माहिती असावी असंही त्यांनी सांगितलं. संसद भवनात २६ मार्चपासून ते २२ एप्रिल या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.
Site Admin | April 3, 2025 8:13 PM | LokSabha Speaker Ombirla
कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो – लोकसभा सभापती ओम बिर्ला