वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ देण्यात यावे अशा सूचना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्या. IRCTC च्या वेबसाइटवर खाती उघडण्यासाठी कठोर पडताळणी सुरू केल्यापासून नव्या खात्यांची संख्या दैनंदिन १ लाखावरुन ५ हजारापर्यंत कमी झाल्याचं ते म्हणाले. ३ कोटींपेक्षा अधिक बनावट खाती बंद केली असून २ कोटींहून अधिक युझर आयडी निलंबित केल्याचं ते म्हणाले. तिकिट यंत्रणा प्रवाशांकरता सोपी आणि सुलभ असावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
Site Admin | December 13, 2025 9:03 PM | Minister Ashwini Vaishnav
वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ देण्यात यावे अशा रेल्वेमंत्र्यांच्या सूचना