डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रची ७५ पदकांची कमाई

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत ७५ पदकांची कमाई केली आहे. यात २८ सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कास्य पदकांचा समावेश आहे. त्यातही सर्वाधिक २९ पदकं पोहण्याच्या स्पर्धेत मिळाली असून त्यात ७ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. त्याखालोखाल तिरंदाजी, नेमबाजी, सायकलिंक, भारोत्तोलन, मल्लखांब, टेबलटेनिस आणि खो-खो या खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्राखालोखाल १४ सुवर्ण पदकांसह ३९ पदकं मिळवून कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर राजस्थान २३ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

 

खेलो इंडिया स्पर्धेत सर्व खेळाडू चमकदार कामगिरी करत असून जलतरणात अदिती हेगडे, भारोत्तोलनात हर्षवर्धन साहू आणि धनुर्विद्येत तेजस साळवेनं आज उत्तम खेळाचं प्रदर्शन केलं. महाराष्ट्राच्या अस्मिता ढोणेने आज मुलींच्या ४९ किलो वजनी गटात नवा विक्रम प्रस्थापित केला. अस्मितानं  क्लीन अँड जर्क प्रकारात ९५ किलो आणि एकूण १७० किलो वजन उचललं आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.   

 

आज झालेल्या कबड्डी स्पर्धेत मात्र हरयाणा संघानं महाराष्ट्राच्या संघाला ३९-२८ च्या फरकानं हरवलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.