खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र ८९ पदकांसह पदकतालिकेत अव्वल

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ८९ पदकांसह पदकतालिकेतलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेचा आजचा दहावा दिवस असून आज झालेल्या जिमनॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या परिना हिने सुवर्णपदक जिंकलं आहे. याच स्पर्धेत महाराष्ट्राच्या देवांगी पवार हिने कांस्य पदकाची कमाई केली आहे. बॉल जिमनॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या किमया कारळे हिने सुवर्ण पदक जिंकलं असून परिनाला रौप्य पदक मिळालं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.