डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

खेलो इंडिया स्पर्धेत १५८ पदकं जिंकत महाराष्ट्र अव्वल

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ५८ सुवर्ण आणि ४७ रौप्य पदकांसह १५८ पदकं मिळवून महाराष्ट्र पदकतालिकेत अग्रस्थानी आहे. हरियाणाने जोरदार कामगिरी करत ३९ सुवर्ण आणि २७ रौप्य पदकांसह एकूण ११७ पदकं मिळवून दुसरे स्थान पटकावलं. राजस्थान २४ सुवर्ण पदकांसह ६० पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. 

 

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची आज सांगता होत आहे. बिहारमधे पटना इथं पाटलीपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात हा सोहळा सुरू आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, इतर प्रशासकीय अधिकारी, क्रीडाक्षेत्रातले इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.