डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बिहारमध्ये ७व्या खेलो इंडिया स्पर्धेला आजपासून सुरुवात

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून बिहारमधे सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाटणा इथे  या स्पर्धांचं उदघाटन होणार आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यावेळी उपस्थित असतील. बिहारमधल्या पाटणा, राजगिर, गया, भागलपूर आणि बेगुसराय या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन होणार असून २८ क्रीडाप्रकारांमध्ये देशातले सुमारे साडेआठ हजार खेळाडू सहभागी होतील. यातल्या नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहेत. 

 

खेलो इंडिया स्पर्धेसाठी राज्यातून ४३७ खेळाडू सहभागी होत आहेत. तिरंदाजी, कबड्डी, ज्युडो, मल्लखांब, जलतरण, खो-खो या खेळातल्या १९० सहभागी खेळाडूंचं पहिलं पथक काल पाटणा इथं रवाना झालं. नेमबाजी स्पर्धेतल्या १३ खेळाडूंचा संघ उद्या रवाना होणार आहे. गेल्या वर्षी १५८ पदे जिंकत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर होता .

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.