डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Khelo India Youth Games : तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्णपदकाकडे वाटचाल

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तिरंदाजी प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. महिला गटात वैष्णवी पवार  आणि शर्वरी शिंदे यांच्यात सुवर्ण पदकासाठी सामना होणार आहे. तर पुरुष गटात महाराष्ट्राचा उज्ज्वल ओळेकर आणि तामिळनाडूचा एल आर सर्वेश यांच्यात सामना होणार आहे. 

 

कम्पाऊंड स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राचा मानव गणेश जाधव आणि झारखंडचा देवांश सिंह यांच्यात सुवर्ण पदकासाठी लढत होईल. तर महिला गटात महाराष्ट्राच्यात तेजल साळवे आणि प्रथिका या सुवर्णपदाकाच्या दावेदार आहेत. 

 

नेमबाजीमधे एअर रायफल प्रकारात राजस्थानच्या संघानं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. राजस्थानच्या मयांक चौधरी आणि प्राची यांनी सामन्यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. तर उत्तर प्रदेशच्या देव प्रताप आणि उर्वा चौधरी यांनी १५-१५ अशी बरोबरी साधण्यात यश मिळवलं. 

 

गटका या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि चंदीगड या राज्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत विजय मिळवला. तर  गोव्याला बिहारकडून आणि तेलंगणाला आसामकडून पराभव पत्करावा लागला. पंजाब, झारखंड आणि तामिळनाडू या राज्यांनीही आपल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत स्पर्धेत मुसंडी मारली. 

 

महिलांच्या फूटबॉल सामन्यात तामिळनाडूने बिहारचा २-१ असा पराभव केला. बेगुसरायमधल्या रिफायनरी मैदानावर आज हा सामना झाला. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज कब्बडी, धनुर्विद्या या क्रीडा प्रकारांचेही सामने झाले.