दीवच्या समुद्र किनाऱ्यावर झालेल्या खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. या पहिल्याच बीच स्पर्धेत महाराष्ट्राने ५ सुवर्ण पदकांसह, ५ रौप्य, आणि १० कास्य अशी एकंदर २० पदकं जिंकत उपविजेतेपद पटकावलं. मणिपूर संघाला विजेतेपद मिळालं. महाराष्ट्राने पेंचक सिलटमध्ये ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कास्य अशी एकंदर १२ पदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले. सागरी जलतरणातही २ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कास्य पदकं मिळवली. बीच सॉकर, बीच कबड्डी या सांघिक खेळात कांस्य पदकावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नाव कोरलं. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा करंडक प्रदान करण्यात आला.
Site Admin | May 26, 2025 2:52 PM | Khelo India Beach Game
खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची सांगता
