कल्याणमधे एका अल्पवयीन मुलाची फसवणूक करून त्याचं खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी समाज माध्यमावर एका तरुणीच्या नावाचं बनावट खातं तयार करून या मुलाशी मैत्री केली.
प्रेमसंबंधांचा आभास निर्माण करून त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला कल्याणमध्ये नांदिवली भागात भेटायला बोलवलं. मात्र, प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्याचं अपहरण करून त्याच्या पालकांकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माग काढत या मुलाची सुटका केली आणि आरोपींना अटक केली.