January 1, 2026 4:47 PM

views 21

कल्याणमधे अल्पवयीन मुलाच्या अपहरणा प्रकरणी चौघांना अटक

कल्याणमधे एका अल्पवयीन मुलाची फसवणूक करून त्याचं खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी समाज माध्यमावर एका तरुणीच्या नावाचं बनावट खातं तयार करून या मुलाशी मैत्री केली.   प्रेमसंबंधांचा आभास निर्माण करून त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला कल्याणमध्ये नांदिवली भागात भेटायला बोलवलं. मात्र, प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्याचं अपहरण करून त्याच्या पालकांकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माग काढत या मुलाची सुटका केली आणि आ...

May 20, 2025 8:32 PM

views 23

कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

कल्याणमध्ये एका रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं. दुपारी तीनच्या सुमाराला या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडल्याची माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली. यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकंदर ११ जणांपैकी पाच जणांना अग्निशमन दलानं बाहेर काढलं, तर सहा जण दगावल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं.  मृतांच्या कुटुंबीयांन...

August 26, 2024 3:51 PM

views 26

कल्याण इथं दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

कल्याण इथं दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी पीडिता आरोपीच्या घरात खेळायला गेलेली असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र यादव याला अटक केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने यादव याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.