डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला संप कोलकात्यातील आपात्कालीन सेवेतल्या डॉक्टरांकडून मागे

पश्चिम बंगालमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील कनिष्ठ डॉक्टर आपत्कालीन सेवेत रुजू झाले आहेत. गेले ४२ दिवस सुरू असलेला संप त्यांनी मागे घेतला. कोलकात्यातील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ हे कामबंद आंदोलन सुरू होते. मात्र या डॉक्टरांनी बाह्यरुग्ण सेवा सुरू केलेली नाही. त्यांचा लढा न्यायालयामार्फत सुरूच राहिल असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्य सरकारनं सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी दहा कलमी निर्देश जारी केले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.