लष्कर ए तैयबाच्या तीन सदस्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण ६० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असलेल्या लष्कर ए तैयबा संघटनेच्या तीन सदस्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण ६० लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. या दहशतवाद्यांवर  प्रत्येकी वीस लाखांचं इनाम पोलिसानी ठेवलं आहे. या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी नागरिक असलेले हाशीम मुसा, अली भाई यांच्यासह जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातला हुसेन ठोकर यांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे.  पोलिसांनी तिन्ही संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रं जारी केली आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.