जम्मू काश्मीरमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी येत्या सोमवारी राज्य विधानसभेचं अधिवेशन बोलावलं आहे.
सिन्हा यांनी आज श्रीनगरमधल्या राज भवनात लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत राज्यातल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. लष्करप्रमुख द्विवेदी यांनी आज सकाळी श्रीनगरला आल्यावर सुरक्षा स्थितीचा परामर्श घेतला तसंच नियंत्रण रेषेदरम्यान पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत माहिती घेतली. पहलगाम इथल्या घटनास्थळालाही त्यांनी भेट दिली.