डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

J&K Assembly : विधानसभेत गदारोळानंतर कामकाज तहकूब

जम्मूकाश्मीर विधानसभेत वक्फ दुरुस्ती कायद्यावर चर्चेची मागणी फेटाळल्यामुळे झालेल्या गदारोळानंतर कामकाज तहकूब करण्यात आलं. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि काही अपक्ष आमदारांनी प्रश्नोत्तराचा तास थांबवून वक्फ दुरुस्ती कायद्यावर चर्चा घेण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती. मात्र, या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असल्यानं चर्चा घेता येणार नसल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. त्यामुळे सत्ताधारी आमदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. गदारोळ वाढल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.