अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा इथं एका फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत एका कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथंही आज एका खासगी बसला आग लागली. यातून ३९ प्रवासी प्रवास करत होते. यातल्या काही जणांना किरकोळ जखम झाली आहे. मात्र अनेक प्रवाशांचे सामान जळून खाक झाले.