August 18, 2025 2:54 PM

views 41

जालना जिल्ह्यात अपघातात 3 तर अहिल्यानगरमधे दुकानाला आग लागून 5 जणांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा इथं एका फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत एका कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.   नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथंही आज एका खासगी बसला आग लागली. यातून ३९ प्रवासी प्रवास करत होते. यातल्या काही जणांना किरकोळ जखम झाली आहे. मात्र अनेक प्रवाशांचे सामान जळून खाक झाले.

February 22, 2025 8:28 PM

views 29

जालन्यात वाळूच्या ढिगाऱ्या खाली दबल्यानं ५ मजूरांचा मृत्यू

महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी इथं आज पहाटेच्या सुमारास पाच मजुरांचा मृत्यू झाला. पासोडी रस्त्यावरच्या पुलाच्या बांधकामासाठी हे मजूर आले होते आणि पत्र्याची शेड करून राहत होते. अवैध वाळू वाहतुकीच्या टिप्पर चालकानं घाईनं टिप्पर रिकामा करताना झोपलेल्या मजुरांना पाहिलं नाही, आणि त्यांच्यावर वाळू ओतली. त्यामुळे ही घटना घडली.  वाळूच्या ढिगाऱ्याखालून गावकऱ्यांनी एका लहान मुलीला सुखरूप  बाहेर काढलं असल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जेसीबीच्या सहायानं ...