ईराणविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन रायझिंग लायनमध्ये त्यांच्या तीन मुख्य अण्वस्त्र तळांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा इस्रायलच्या IDF या सशस्त्र सेनेनं केला आहे.
गेल्या १२ दिवसांपासून हे ऑपरेशन सुरू असून ईराणमधील आण्विक आणि मिसाईल नष्ट करणं हे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचं IDF नं सांगितलं. ईराणमध्ये मिसाईल निर्मिती आणि आण्विक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हे ऑपरेशन हाती घेतलं.
आण्विक कार्यक्रम आणि मिसाईलच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ११ वैज्ञानिक या ऑपरेशनमध्ये मारले गेले आहेत. आतापर्यंत ईराणचे २०० मिसाईल लाँचर, जमिनीवरून हवेत मारा करणारी यंत्रणा तसंच वायु दलाची सहा ठिकाणे उद्धवस्त झाल्याची माहिती IDF नं दिली.