डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ नियंत्रण विभागानं तस्करी होत असलेले अमली पदार्थ जप्त केले. यात 74 हजार कॅप्सूल तसंच अडीच लाख बनावट सिगारेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांकडून मोठ्या प्रमाणात औषधांची तस्करी होत असल्याची माहिती नियंत्रण विभागाला मिळाली होती. त्याआधारे विमानतळावर ही कारवाईत करण्यात आली. या प्रकरणी दोन कुरिअर आणि मालवाहतूक कंपन्यांची चौकशी सुरू आहे.