इंडिगो विमानसेवांमध्ये अनियमिततेबद्दलची जनहित याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

इंडिगोच्या विमानसेवांमध्ये निर्माण झालेल्या अनियमिततेबद्दलची जनहित याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात आधीच सुनावणी सुरू असल्याची नोंद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या पीठानं घेतली आणि याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयातल्या सुनावणीत सहभागी व्हायची मुभा दिली.