विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी १० हजार रुपयांचे प्रवासाचे कूपन देणार आहे. या कुपनचा वापर वर्षभराच्या आत इंडिगोचे तिकीट आरक्षित करण्यासाठी करता येईल. ३ ते ५ डिसेंबरच्या दरम्यान उड्डाण रद्द झालेल्या, विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांना ही कूपन दिली जातील, असं कंपनीनं पत्रक काढून स्पष्ट केलंय.
याशिवाय उड्डाणाला २४ तासापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना उड्डाण रद्द झालेल्या विमान प्रवाशांना ५ ते १० हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.