गेल्या आठवड्यातील इंडिगो विमानाच्या उड्डाणांना विलंब आणि उड्डाणं रद्द होण्याच्या घटनांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गुरूग्राममधील इंडिगोच्या कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथक स्थापन केले आहे. महासंचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार, विमान विलंब, उड्डाणे रद्द होणे यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्याचा उद्देश यामागे आहे.
उपमुख्य उड्डाण संचालन निरीक्षक कॅप्टन विक्रम शर्मा, यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्याचं पथक विमान संख्या, कर्मचाऱ्यांची उपलब्धता, कामाचे तास, अनियोजित सुट्या, कॉकपिट आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी राखीव कर्माचीारी यांसह प्रमुख कार्यचालन क्षेत्रांवर लक्ष ठेवणार आहे. कंपनीच्या कार्यालयात आळीपाळीने दोन सदस्य उपस्थित राहातील, तर महासंचालनालयाचे अधिकारी ऐश्वीर सिंह आणि मणी भूषण दररोज रद्द विमान संख्या, परतावा प्रक्रिया, प्रत्यक्ष कार्यचालन, प्रवासी नुकसान भरपाई आणि सामानाचे वितरण यांवर लक्ष देणार आहेत.