१९ वर्षाखालील महिला क्रिकेटच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

१९ वर्षाखालील महिला क्रिकेटमध्ये भारताने काल मलेशियातील क्वालालम्पूर इथं झालेल्या वीस षटकांच्या सामन्यात श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ९८ धावा केल्या. भारताने हे उद्दिष्ट १५ व्या षटकात पार केलं. भारतातर्फे आयुषीने चार तर पारुनिकाने दोन बळी घेतले. उद्या अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.