February 2, 2025 8:10 PM

views 41

Women’s U19 T20 World Cup: महिला क्रिकेटमध्ये, 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून मात करत भारतानं पटकावलं विजेतपद

महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवत, विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावात गारद झाला.   भारताच्या गोंगदी त्रिशानं सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर पारुनिका सिसोदिया,आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन आणि शबनम शकिल हिनं एक गडी बाद केला. विजयासाठी ८३ धावांचं लक्ष्या भारतानं एका गड्याच्या बदल्यात बाराव्या षटकातच पार केलं. गोंगदी त्रिशा...

December 21, 2024 9:32 AM

views 27

१९ वर्षाखालील महिला क्रिकेटच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

१९ वर्षाखालील महिला क्रिकेटमध्ये भारताने काल मलेशियातील क्वालालम्पूर इथं झालेल्या वीस षटकांच्या सामन्यात श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ९८ धावा केल्या. भारताने हे उद्दिष्ट १५ व्या षटकात पार केलं. भारतातर्फे आयुषीने चार तर पारुनिकाने दोन बळी घेतले. उद्या अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे.

August 21, 2024 1:50 PM

views 34

संयुक्त अरब अमीरातींमध्ये महिलांची २० षटकांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा

महिलांची २० षटकांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमीरातींमध्ये घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं घेतला आहे. याआधी ही स्पर्धा बांग्लादेशात होणार होती. स्पर्धेचं अधिकृत यजमानपद मात्र बांग्लादेश क्रिकेट मंडळाकडेच असेल. दुबई आणि शारजाह मध्ये ३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धेतले सामने खेळले जातील. आयसीसीचे प्रमुख कार्यवाह जेफ अलार्डिस यांनी एका निवेदनाद्वारे हा निर्णय कळवला आहे.