येत्या ५ वर्षात मुंबईसह एकूण ४८ मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या, अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांना दिल्या आहेत. त्यासाठी शहरी भागात नवीन टर्मिनलची उभारणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
Site Admin | December 26, 2025 7:27 PM | Indian Railway | Mumbai
मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची क्षमता दुप्पट होणार