डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुवर्णा’ या युद्धनौकेची टांझानियामध्ये दार-ए-सलाम या बंदराला भेट

भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुवर्णा’ या युद्धनौकेनं १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान, टांझानियामध्ये दार-ए-सलाम या बंदराला भेट दिली. आयएनएस सुवर्णा, सध्या एडनच्या आखातात सागरी चाचेगिरी विरोधी मोहिमेवर तैनात आहे.

 

आयएनएस सुवर्णाच्या दार-ए-सलाम बंदर भेटी दरम्यान भारत आणि टांझानियाच्या नौदलांनी परस्परांशी औपचारिक संवाद साधला, आणि संयुक्त कवायतींमध्ये भाग घेतला. शोध, जप्ती, नुकसान नियंत्रण आणि अग्निशमन कवायती, क्रीडा सहभाग, या उपक्रमांचा यात समावेश होता.
भारत सरकारच्या, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात सागरी सहकार्य वाढवण्यासाठी धोरणात्मक चौकट निर्माण करण्याच्या, ‘सागर’ या दृष्टिकोनाला अनुसरून, दोन्ही देशांमधले लष्करी आणि राजनैतिक संबंध वृद्धिंगत करणं हे या भेटीचं उद्दिष्ट आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.