भारतीय नौदल ‘तमाल’ या लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार

भारतीय नौदल येत्या १ जुलै रोजी रशियातल्या कॅलिनिनग्राड इथं ‘तमाल’ या आपल्या बहुपयोगी लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार आहे. भारत आणि रशियाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल संजय सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्या दोन दशकात रशियाकडून समाविष्ट होणाऱ्या क्रीवाक श्रेणीतल्या लढाऊ जहाज मालिकेतलं हे आठवं जहाज आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे.