December 17, 2025 12:48 PM | Indian Navy

printer

INAS 335 ऑस्पेज नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार

INAS 335 ऑस्पेज हे दुसरं MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर स्कॉड़्रन नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज झालं आहे. गोव्यातल्या INS हंसा या नौदलतळावर आज दुपारी होणाऱ्या कार्यक्रमात नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत I N A S 335 ऑस्पेज नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. अत्याधुनिक शस्त्र, सेन्सर्सने सुसज्ज असलेल्या I N A S 335 ऑस्पेजमधे पाणबुडीविरोधी युद्ध, पृष्ठभागावरल्या हल्ल्यांचा सामना करण्याची क्षमता आहे. यामुळे नौदलाची लांबपल्ल्यावर मारा  करण्याची क्षमता वाढणार आहे.