भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उद्या परिषदेला संबोधित करतील. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्धसज्जतेबाबत या परिषदेत विचारविनिमय होईल. नौदलप्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेत हिंदी महासागरातल्या सुरक्षास्थितीचा आढावा घेतील.
लष्कर, हवाई दल आणि तटरक्षक दलाबरोबर समन्वयाने हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करणं हे नौदलाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. ही परिषद ३ दिवस चालणार आहे.