मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांची शोधमोहिम

मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री जप्त केली. मणिपूरमध्ये जिरीबाम, तेंग्नोपाल, काकचिंग, उखरुल, इम्फाळ पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगराळ तसंच सखल भागातल्या जिल्ह्यांमध्ये मणिपूर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपीच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २५ शस्त्रं, आयईडी, ग्रेनेड, दारुगोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली. तसंच, कांगपोकपी जिल्ह्यातले बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.