भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घालणार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.

 

त्यामुळे भारतातील नोंदणीकृत विमानं तसंच भारतीय कंपन्यांच्या मालकीची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली विमानं पाकिस्तानच्या  हवाई क्षेत्राचा वापर करू शकणार नाहीत. उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडची एअर इंडियाची काही उड्डाणं पर्यायी विस्तारित मार्गानं जातील, असं एअर इंडियानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.