भारतीय हवाई दलाचा ९३ वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हवाई दलाचे जवान आणि त्यांच्या कुुटंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात हवाई दलाच्या जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं. तर शौर्य आणि शिस्तीचं प्रदर्शन करत हवाई दल अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही देशाचं रक्षण करतं असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात काढले. सर्व देशवासियांना जवानांचा अभिमान आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले.
Site Admin | October 8, 2025 2:27 PM
भारतीय हवाई दलाचा ९३ वा स्थापना दिन आज साजरा
