डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात पाठवण्यासाठी टपाल विभागाची विशेष सुविधा

देशभरात पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात टपालाने पाठवता यावं याकरता ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु होणार आहे. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. येत्या १ मे पासून ही सेवा सुरु होणार असून त्यात टपालाने पाठवलेल्या साहित्याचा माग काढण्याची सुविधा आहे. सर्व स्तरातल्या व्यक्ती आणि समूहांच्या सक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यासाचं साहित्य सहज आणि वाजवी दरात पोहचवण्याची सेवा सरकार देत आहे, असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.