भारतीय डाक विभागानं नागरिकांची पत्रं आणि पार्सल जलद गतीने पोहोचवण्यासाठी आपल्या ताफ्यात २११ इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश केला आहे. आज मुंबईच्या चकाला इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये या सेवेचा आरंभ करण्यात आला. या इलेक्ट्रिक दुचाकींंच्या माध्यमातून जीपीओ, चकाला, शीव, दादर आणि काळबादेवी इथल्या पोस्ट ऑफिसमधून या भागातली सर्व प्रकारची पत्रं आणि पार्सल पोहोचवण्यात येणार आहेत.
