डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत आणि फ्रान्समध्ये व्यवसायाची भूमिका वाढत आहे – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध परिपक्व होत असताना व्यवसायाची भूमिकाही वाढत आहे, असं मत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल 14 व्या भारत-फ्रान्स मुख्य कार्याध्यक्षांच्या मंचाचं उद्घाटन करताना बोलत होते. भारत आणि फ्रान्स ही स्वतंत्र विचारसरणीची परंपरा असलेली राष्ट्रे असून दोन्ही देशातील सहकार्यामुळे मेक इन इंडिया धोरणालाही लाभ होईल असं डॉ. एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितलं.