भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पन्नास षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना भारतानं 9 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 236 धावा केल्या. भारताकडून हर्षित राणानं सर्वाधिक 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नाबाद 168 धावांची भागीदारीच्या जोरावर भारतानं 11 षटकं आणि 3 चेंडू राखून हा सामना जिंकला. रोहितनं 121 तर मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीनं 74 धावा केल्या. आता दोन्ही संघांदरम्यान येत्या 29 ऑक्टोबरपासून कॅनबेरा इथं वीस षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर होणार आहे. भारतीय महिला संघ यापूर्वीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे.