January 11, 2026 8:09 PM

views 75

एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढं विजयासाठी ३०१ धावांचं आव्हान

भारतीय क्रिकेट संघाच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, आज वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात, न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी ३०१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूझीलंडनं निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३०० धावा केल्या.    शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३४ षटकात २ बाद --- धावा झाल्या होत्या. शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११८ धावांची भागिदारी केली. 

January 11, 2026 6:26 PM

views 127

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला सामना वडोदरामध्ये सुरु

भारतीय क्रिकेट संघाच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या न्यबझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, आज वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात, न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी ३०१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूझीलंडनं निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३०० धावा केल्या. डेरिल मिशेलनं सर्वाधिक ८४ धावा केल्या. डेवोन कॉनव्हेनं ५६ तर हेन्री निकोल्सनं ६२ धावांचं योगदान दिलं.  भारतातर्फे मोहमद सिराज, हर्षीत राणा, आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी...

October 26, 2025 9:01 AM

views 66

पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचाऑस्ट्रेलियावर 9 गडी राखून विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पन्नास षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना भारतानं 9 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 236 धावा केल्या. भारताकडून हर्षित राणानं सर्वाधिक 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नाबाद 168 धावांची भागीदारीच्या जोरावर भारतानं 11 षटकं आणि 3 चेंडू राखून हा सामना जिंकला. रोहितनं 121 तर मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीनं 74 धावा केल्या. आता दोन्ही संघांदरम्यान येत्या 29 ऑक्टोबरपासून कॅनबेरा ...

October 12, 2025 1:50 PM

views 248

महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. विशाखापट्टणम इथं भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरू होईल. काल रात्री, कोलंबो इथल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ८९ धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला.