मुंबईत ५६व्या ‘इफ्फी’च्या सुकाणू समितीची बैठक

गोव्यात होणारा ५६व्या ‘इफ्फी’च्या सुकाणू समितीची पहिली बैठक आज मुंबईत झाली. बैठकीच्या अध्यक्षपदी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव होते. सुकाणू समितीचा विस्तार करण्यात आला असून  सदस्यांची संख्या 16 वरून 31 करण्यात आली आहे. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.