आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. विशाखापट्टणम इथं भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरू होईल.
काल रात्री, कोलंबो इथल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ८९ धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला.