डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हौदी क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्राएलचे ६ नागरिक जखमी

येमेनच्या हौदी बंडखोरांनी डागलेलं क्षेपणास्त्र इस्राएलच्या तेल अवीव इथल्या बेन गुरियन विमानतळाजवळ पडल्यामुळे ६ नागरिक जखमी झाल्याचं इस्राएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हल्ल्यानंतर बेन गुरियन विमानतळावर तात्पुरती थांबवलेली हवाई वाहतूक पुन्हा सुरु झाली असल्याचं इस्रायल विमानतळ प्राधिकरणानं म्हटलं आहे. 

 

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातून तेल अवीव विमानतळावर जाणारी विमानसेवा एअर इंडिया ने येत्या ६ मे पर्यंत स्थगित केली आहे. तसंच टीयूएस एअरवेज आणि लुफ्थांसा ग्रुपसह काही विमानसेवा देखील रद्द केल्या आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा