डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पूंछ शहराला भेट

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकव्याप्त काश्मीरच्या गोळीबारात सीमावर्ती भागातल्या मालमत्ता आणि धार्मिक स्थळांना झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूंछ शहराला भेट दिली. तसंच पाकव्याप्त काश्मीरच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या, अशी माहिती आमच्या जम्मू इथल्या प्रतिनिधीने दिली.

 

इथल्या विश्रांती गृहावर झालेल्या कार्यक्रमात  गृहमंत्र्यांनी बाधित कुटुंबांना आर्थिक मदत वाटप केली आणि गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नियुक्तीपत्रेही वाटली. शहा यांनी पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केलेल्या आणि गोळीबारात नुकसान झालेल्या धार्मिक स्थळांनाही भेट दिली. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा आणि इतर व्यवस्थांचाही शहा यांनी आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.