जम्मूकाश्मीर विकास आणि शांततेच्या मार्गावर प्रगती करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

ईशान्य क्षेत्र आणि जम्मू-काश्मीर विकास आणि शांततेच्या मार्गावर प्रगती करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ‘नक्षलमुक्त भारत: लाल दहशतवादाचा अंत’ या राष्ट्रीय शिखर परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. सरकारनं संवाद, सुरक्षितता आणि समन्वय या तीन प्रमुख तत्वांवर काम केलं आहे. परिणामी 2004 ते 2014 या दशकाच्या तुलनेत 2014 ते 2024 दरम्यान ईशान्येकडील सैन्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूंमध्ये 70 टक्के घट झाली आहे. याच काळात या प्रदेशात हिंसाचारामुळं होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूंमध्येही 85 टक्क्यांनी घट झाली आहे असं शहा यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.