डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते अहिल्यानगर मध्ये प्रवरानगर इथं डॉ. विठ्ठलटाव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण सोहळा झाला.  तर लोणी इथं त्यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि  लोकनेते, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं  अनावरण झालं.  याशिवाय देशातला  पहिला सहकारी कॉम्प्रेस बायो गॅस  प्रकल्प आणि  स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचं उदघाटन देखील त्यांच्या हस्ते झालं.  

 

यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्याला अमित शाह  संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यातले मंत्री आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 

 

तत्पूर्वी  अमित शहा यांचं काल शिर्डी इथं आगमन झाल्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झाली.  त्यानंतर आज सकाळी  अमित शहा यांनी  शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेतलं.