डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्‍मू काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

विधानसभा निवडणुकीनंतर जम्‍मू काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल, असं आश्‍वासन भाजपचे वरिष्‍ठ नेता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिलं. ते  जम्‍मूमध्ये जाहीर प्रचार सभेत बोलत होते.  आगामी विधानसभा निवडणूक ऐतिहासिक असल्याचं ते म्हणाले. कलम ३७० हटवल्यानंतर जम्‍मू काश्‍मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. काँग्रेस – नॅशनल कॉन्फरेन्स आघाडी जुनी व्‍यवस्‍था पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच जम्‍मू कश्‍मीरला पुन्हा दहशतवादाच्या खाईत लोटण्याचा या आघाडीचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.