डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

छत्तीसगडमधला नक्षलवाद पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत संपवण्याचा सरकारचा संकल्प-गृहमंत्री

छत्तीसगडमधला नक्षलवाद पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत संपवण्याचा संकल्प सरकारनं केला असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री शहा आज त्यांच्या छत्तीसगड दौऱ्यादरम्यान बस्तर जिल्ह्यात दंतेवाडा इथल्या बस्तर उत्सवाच्या समारोप समारंभाला उपस्थित होते. माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्तीसगडच्या आदिवासी कला आणि हस्तकला यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी बस्तर पांडुमचं कौतुक केलं. या तीन दिवसीय उत्सवात आदिवासी नृत्य, लोकगीत, आदिवासी नाटक, वाद्ये, पोशाख, दागिने, हस्तकला आणि पाककृती अशा सात विषयांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. 

 

तत्पूर्वी, शहा यांनी दंतेवाडा इथल्या दंतेश्वरी मंदिरात प्रार्थना केली. गृहमंत्री आज संध्याकाळी राजधानी रायपूरमध्ये विभागीय आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी नक्षलवादाचं उच्चाटन करण्याच्या दिशेनं झालेल्या प्रगतीचा आढावा देखील ते घेणार आहेत.